यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार अमोल जावळे यांनी शुक्रवारी यावल तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये जाऊन झाडाझडती घेतली. तहसील कार्यालयात पुरवठा विभागातील गलथान कारभार तसेच पंचायत समितीमध्ये अनुपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी याबाबत प्रशासनाला चांगलेच भेटीस धरले. केवायसीसाठी फेऱ्या मारणाऱ्या एका वृद्ध महिलेची केवायसी स्वतःच त्यांनी संगणकावर बसून करून दिली व कर्मचारी साईट बंद आहे असे सांगतात. मात्र त्यात कितपत तथ्य आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले तर पंचायत समिती मधल्या अस्वच्छते बाबत त्यांनी तेथील उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडून देखील केली व येथील अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे आपण तक्रार करू व हा प्रश्न आपण थेट विधानसभेत मांडू असे देखील त्यांनी सांगितले.
यावल तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयात आमदार अमोल जावळे यांनी आज शुक्रवारी अचानक भेट दिली यावल तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात ई-केवासी साठी एक वृद्ध महिला दोन वेळा यापूर्वी चक्रा मारल्या होत्या मात्र साईट बंद आहे असे सांगण्यात आले होते तेव्हा आमदार जावळे यांनी स्वतः त्या वृद्ध महिलेचा हात धरून त्यांना कार्यालयात नेले व स्वतःच विभागाच्या संगणकावर त्यांनीच बसून संबंधित साईड ओपन केली त्याचप्रमाणे पुरवठा विभागात देखील साईड बंद आहे असे सांगण्यात येत होते तेव्हा तेथे देखील त्यांनी स्वतः संगणक हाताळले आणि नवीन नोंदणी होत आहे हे तेथील कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी दाखवून दिले व कशा पद्धतीने साईट बंद आहे असे नाव सांगून येथील कर्मचारी नागरिकांची हेळसाळ करतात हे पाहून त्यांनी चांगला संताप व्यक्त केला त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये देखील ते दाखल झाले.
पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी या नव्हत्या सहाय्यक गटविकास अधिकारी देखील नव्हते पावणे पाच वाजता कार्यालयात सर्वत्र सॅमसंग होती म्हणून त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून येथील कर्मचाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण आहे का असा प्रश्न उपस्थित केला दरम्यान त्यांनी स्वतःच येथील स्वच्छतागृह व इतर विभागात भेट देऊन पाहणी केली असता तेथील प्रचंड अस्वस्थ बाबत अस्वच्छतेबाबत उपस्थित कक्ष अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणे केली. तर येथील अधिकारी कर्मचारी यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही असे दिसून आले आहे. त्यांनी वरिष्ठांकडे आपण यांची तक्रार करून व हा प्रश्न विधानसभेत मांडू असे देखील सांगितले.
पुरवठा विभागाबद्दल प्रचंड अनास्था पुरवठा विभागात बाराअंकी क्रमांक साठी अनेक लोकचक्रा मारताहेत साईड बंद आहे याच्या नावाखाली नागरिकांची येथे पिळवणूक केली जात आहे. अशा तक्रारी देखील याप्रसंगी अमोल जावळे यांच्याकडे करण्यात आल्या त्यांनी स्वतः साईट पडताळून पाहिली असता त्यामध्ये नवीन नोंदणी होत आहे असे सांगितले आणि हे कर्मचारी जर अशा पद्धतीने वागत आहे ते यांच्या संदर्भात आपल्याला नक्कीच विचार करून त्यांच्या तक्रारी कराव्या लागतील अशी देखील ते बोलले.
पंचायत समितीच्या कारभारावर प्रचंड संताप.
यावल पंचायत समितीच्या विविध विभागात पावणे पाच वाजता सामसुम दिसुन आली हे पाहून परिस्थिती पाहून आमदारांनी प्रचंड संताप केला तर गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड या देखील येथे नव्हत्या इतर कक्षात काहीच मोजकेच अधिकारी होते व त्यांना व्यवस्थित उत्तर देखील देता येत नव्हती हे पाहून आमदार यांनी त्यांची चांगली जागा घेतली भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, बाळू फेगडे, भूषण फेगडे, व्यंकटेश बारी, अनिकेत चोरटे आदींची उपस्थिती होती