जळगाव, प्रतिनिधी | स्वायत्त मू. जे. महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या वतीने दि. १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृत दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. वसंत भट यांचे “अभिज्ञान शाकुंतलातील प्रतिमा स्थाने” या विषयावर व्याख्यान सोमवार दि.२६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार २६ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०:०० वा. मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम् सभागृह , ग्रंथालय, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता संस्कृतप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे संस्कृत विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस मू.जे. महाविद्यालयात सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे मुलभूत ज्ञान मिळावे या उद्देशाने या संस्कृत प्रमाणपत्र आभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संस्कृत विभागाशी संपर्क करावा असे संस्कृत विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.