जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालय, इव्हेंट मॅनेजमेंट विभाग, झाल्टे बिल्डर्स अॅन्ड लॅन्ड डेवलपर्स व पातोन्डेकर ज्वेलर्स आयोजित कार्यक्रम “खान्देश गॉट टॅलेन्ट – २०२०”उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी के.सी.ई. सोसायटीचे सदस्य हरिष मिलवाणी होते व प्रमुख उपस्थिती म्हणून आ.सुरेश भोळे, खा. उन्मेश पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. स्मिता वाघ, समाजसेवक नरेश खंडेलवाल, के.सी.ई.चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, अॅड. राजेश झाल्टे, कविता झाल्टे, किरण पातोंडेकर व पूजा पातोडेकर, साहस फाऊंडेशनच्या संचालिका सरीता माळी, गुरव समाजाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष मीठाराम गुरव,कर्तव्य बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सुनिल चौधरी, मनोकल्प अंग्रोटेकचे संचालक मनोज वाणी व प्रा.उदय कुलकणी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला मुख्य आकर्षण म्हणून मराटी सिने अभिनेत्री गायत्री दातार या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात ४२ सहभागी स्पर्धकांचा समावेश होता. त्यामधुन १२ विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी, गिफ्ट व प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वितेसाटी इव्हेंट विभागाचे पंकज कासार व सर्व इव्हेंट विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.
विजेत्या स्पर्धकांचे नावे पुढील प्रमाणे –
मोठा गट सोलो सिंगिंग- १) प्रिया बुरुकले, इंस्ट्रूमेंटल – १) राहुल सपकाळे,ग्रुप डान्स – १) ड्रिम डान्स अकॅडमी
सोलो छोटा गट –१) चार्वी रंधे २) मानसी अडवाणी,डान्स – १) युदिश बाविस्कर २) टेरिझन डान्स 3) भूमी सोनवणे 4) सेजल वाणी