यावल प्रतिनिधी । संपुर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्गाचा अत्यंत वेगाने होत असून या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने नागरीकांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीकोणातुन (दि. १५ते३०) एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू केली असुन या संचारबंदीला मात्र यावल शहरात व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले.
दरम्यान यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत गरज नसतांना फिरणाऱ्या रिकामटेकळ्यांची मोठी गर्दी आज सकाळ पासुन दिसुन येत होती , दरम्यान लॉकडाऊन मध्ये कोणती दुकाने व व्यवसाय बंद ठेव्याची आहे व कोणती नाही या संभ्रम अवस्थेत आज शहरातील अनेक अनावश्यक व्यवसायींकानी ही आपली दुकाने सुरू ठेवल्याचे चित्र दिसुन आले यामुळे संचारबंदी आहे असे कुठही दिसत नव्हते, दरम्यान पोलीस निरिक्षक सुधीर पाटील व पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी शहरात विविध ठीकाणी ग्रस्त घालुन संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही करीत ३० जणांकडुन सुमारे ७६०० दंड वसुल ही केला.
सुमारे ५४ अनावश्यक फिरणाऱ्या नागरीकांची आरोग्य पथकाच्या यावल ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ नानासाहेब घोडके व त्यांच्या आरोग्य सेवकांच्या माध्यमातुन अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली आहे .मात्र तरी देखील नागरीकांची वर्दळ ही बाजारातुन कमी होतांना दिसुन आली नाही . दुपारच्या सत्रात विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी शहरात गस्त घालुन परिस्थितीचा आढावा घेतला . संचारबंदी ही कशा प्रकारची आहे ही बाब अद्याप ही काहींच्या लक्षात येत नसल्याने हा सर्वाघोळ निर्माण झाला असुन, महसुल प्रशासन ,नगर परिषद , आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या कुठतरी समन्वयाचा आभाव असल्याने संचारबंदीवर याचा मोठा परिणाम दिसुन येत असल्याचे जाणकारांचे मत असुन, येणारे काळ हे नागरीकांचे आरोग्य व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा अत्यंत धोका असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.