सारोळा येथील गतीमंद तरूणी बेपत्ता

 

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सारोळा येथील १९ वर्षीय गतीमंद तरूणी घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सारोळा येथील राहणारी करिष्मा सुरेश ठाकरे (वय-१९) ही गतीमंद युवती १ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोणास काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाली आहे. करिष्मा हिचे मानसिक संतुलन ठिक नसुन तिचे बाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचा फोन क्रं. ०२५९६ – २४०१३३ अथवा पोलिस नाईक विश्वास देशमुख यांचे भ्रमणध्वनी क्रमांक – ७७३८५९३३९९ यावर संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content