यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसा येथील २४ वर्षीय महिला आल्या दोन वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा उमेश कोळी (वय-२४) रा. पाडळसा ता. यावल ह्या आपल्या कुटुंबियासह राहतात. मंगळवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गहु घेवून येते असे सांगून दोन वर्षाची मुलीला घेवून घरातून गेल्या. दरम्यान रात्री उशीरापर्यंत त्या घरी न आल्याने दोघांचा गावात तसेच नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध केली. कोठेही आढळून आले नाही. याप्रकरणी रजूबाई कोळी यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हरविलेली विवाहिता आणि मुलगी आढळून आल्यास फैजपूर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.