मुक्ताईनगर प्रतिनिधी । मलकापूर येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकवणीला जाते असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी मलकापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. .
रूतिका गणेश पांडव (वय-१४) रा. मलकापूर जि. बुलढाणा असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. रूतिका ही आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिकवणीला जाते असे सांगून ती घराबाहेर पडली. दरम्यान रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पालकांनी तिचा शोधाशोध केली. क्लास आणि मैत्रीणींकडे देखील शोध घेतला. याबाबत मलकापूर पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीसांनी लोकेशन चेक केले असता मुलीचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे मुक्ताईनगर शहरातील असल्याचे दिसून आले. त्यानुसार आता पोलीसांनी तपास सुरू केला आहे. बेपत्ता झालेली मुलगी कुणाला दिसून आल्यासे मुक्ताईनगर किंवा मलकापूर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.