यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी केलेल्या मनमानी कारभारातून लाखो रूपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी गटविकास अधिकारी आणि जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच आणि सात सदस्य आहे. सात सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगातून १९ फेब्रुवारी २०१९ ते २४ एप्रिल २०२० दरम्यान सर्वसाधारण सभा कोरम पुर्ण असतांना तहकुब करून मानमानी कारभार केला. शासकीय निधीत मोठा अर्थिक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करण्यात आल्याची लिखीत तक्रार ११ ऑगस्ट २०२० रोजी सात सदस्यांनी केली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी २०१९ ते २४ एप्रिल २०२० दरम्यान १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व ५ टक्के अबंध निधितुन मागील अडीच वर्षाच्या कालावधीत सरपंच, उपसरपंच तथा ग्रामसेवक यांनी वरील कालावधीत सर्वसाधारण सभा कोरम पुर्ण असतांना ही तहकुब करून मनमानी कारभार करून संगनमताने शासकीय निधीत मोठा आर्थीक भ्रष्टाचार व गैरव्यवहार केला. त्यात
कामे व त्यासाठी झालेले खर्च पुढीलप्रमाणे-
विहीर खोदकाम खर्च ४३ हजार, एलईडी लाईट ९९ हजार ९८८, नवीन पाईपलाईन २ लाख रुपये , जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत २ लाख रुपये, पेव्हर ब्लॉक खर्च १ लाख ८५ हजार रुपये, ग्राम पंचायत कार्यालय दुरुस्ती ७१ हजार रुपये, अंगणवाडी अॅक्वागार्ड व गणवेश खर्च १ लाख रुपये, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सॅनेटाईझर, मास्क, आक्झोमिटर खरेदी १ लाख ९ हजार ९५० हजार खर्च, याशिवाय गाव पातळीवर आपले सरकार सेवा केन्द्र १० टक्के रक्कामेनुसार २ लाख ५५ हजार २३४ रुपये अशा प्रकारे ग्रामपंचायतच्या माध्यमातुन खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले.
याशिवाय ग्रामपंचायत मालकीचे शेतजमीनचे शेत स्वामित्व रक्कम जमा करून ग्रामपंचायतीने वर्ष २०१८ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ग्रामपंचायत मालकीचे शेताचा १ लाख ३० हजार प्रति वर्षा प्रमाणे तीन वर्षाकरीता ३ लाख ९०हजार रुपये प्रमाणे सदरची रक्कम ही ग्रामपंचायतीकडे जमा झालेली नाही. या व्यतिरिक्त विद्यमान सरपंच जमशेर तडवी, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्ठाचार आणी गैरव्यहार केला असून बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत सर्व झालेल्या भ्रष्टाचारच्या आणि गोंधळलेल्या कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबधीतांवर कार्यवाही करावी अशी मागणी सात ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. तक्रारीवर ग्रामपंचायत सदस्य रहीम गुलशेर तडवी, छब्बीर शेखर तडवी, मेहरबान हबीब तडवी, आशाबाई मुबारक तडवी, नसीबा रशीद तडवी, सईदा हमिद तडवी आणी जयश्री सुनिल चौधरी या सात ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.