जामनेर येथील भूखंडावर गैरव्यवहार : खडसेंचा विधान परिषदेत आक्रमक सवाल !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथील जिल्हा परिषद मालकीच्या भूखंडावर गैरव्यवहार झाल्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून याची चौकशीचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.त्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी केलेल्या प्रश्नांना सत्ताधारी उत्तर देत आहे. दरम्यान, जामनेर येथील जिल्हा परिषद मालकीच्या भूखंडावर गैरव्यवहार झाल्याबाबतचा प्रश्न आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला आहे.

जामनेर जिल्हा जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वांवर व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. हे खरे आहे काय?, या बांधकामात गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ॲड. विजय भास्कर यांनी ३० मार्च २०२१ रोजी व त्या सुमारास शासनाकडे केली आहे. या संदर्भात शासनाने चौकशी केली आली आहे काय ? चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषीवर कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे. व कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत असा एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला.

त्यावर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर देताना सांगितले. जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर बांधा वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वांवर व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. या बांधकामात गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी व विजय भास्कर यांनी ३० मार्च २०२१ रोजी शासनाकडे केली आहे. प्रस्तुत प्रकरणी ॲड. विजय पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने २३ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार चौकशी समिती गठीत केली असुन चौकशी समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झालेला नाही असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर दिले.

Protected Content