यावल प्रतिनिधी । शहरातील मोची वाडा येथे नगरपालिकेचा नळ लावल्याच्या कारणावरून पत्नीसह तरूणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रविण मगनलाल नारेकर (वय-४०) रा. बुरूज चौका, मोची वाडा, यावल हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. मजूरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेजारी राहणारा रमेश देवराम हानवते याने नळ कनेक्शन लावल्याच्या कारणावरून प्रविण नोरकर याला धारदार शस्त्राने नाकावर वार करून जखमी केले. तर प्रविण यांच्या पत्नीला सुशीला रमेश हानवते आणि लिलाधर देवराम हानवते सर्व रा. मोचीवाडा यांनी दगडमारून दुखापत केली. याप्रकरणी प्रविण नारेकर यांनी यावल पोलीसात तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रमेश देवरात हानवते, सुशिला रमेश हानवते आणि लिलाधर देवराम हानवते यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.