चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नराधमाने चोपडा येथील मुलीच्या मैत्रीणीच्या रूमवर जावून तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश वेस्ता पावरा रा अंमलवाडी पोस्ट उमर्टी ता.चोपडा असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

सतरा वर्षीय पिडीता ही धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असून ती सध्या ती बारावीचे शिक्षण घेत आहे. तिची मैत्रीण चोपडा शहरात बारावीचे शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी अविनाश पावरा याने सन २०२३ मध्ये पिडीत मुलीला तिच्या मैत्रीणीच्या रूमवर नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर २६ जून २०२५ रोजी देखील चोपडा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर निर्जळ ठिकाणी तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीतने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार नराधम अविनाश वेस्ता पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहे.




