
जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीच्या पात्राच्या किनाऱ्याजवळ एका सात वर्षीय मुलीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सात वर्षीय मुलीचा मृतदेह आज सकाळी गिरणा नदीच्या पात्राच्या किनाऱ्याजवळ आढळून आला. तर मुलीचे वडील देखील घरातून बेपत्ता आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहम, तालुका पोलीस स्टेशने पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1271901963000090/


