अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घडला आहे. याबाबत रविवारी २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात विधीसंघर्षीत मुलावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील पाताळनगरी भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही परिसरात असतांना गौतम नगरात राहणारा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा पिडीत मुलीजवळ येवून तिचा हात पकडला आणि मला तू आवडते असे सांगून अश्लिल चाळे करू लागला,. दरम्यान हा प्रकार घडताचा पिडीत मुलीने आरडा ओरड केल्याने तिचा उचलून जवळच्या ड्रममध्ये लोटून दिले. त्यामुळे तिला डोक्याला मार बसला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने धरणगाव पोलीसात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात विधीसंघर्षीत मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.