धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या कुटुंबातील तिघांना मारहाण करून अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली होती. याप्रकरणी गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. तिची छेड काढण्याप्रकरणी संशयित आरोपी रोहित शाम पाटील याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल केला होत. याचा राग मनात धरून संशयित आरोपी याने मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पिडीत मुलीच्या कुटुंबातील तिन जणांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पिडीत मुलीचा हात पकडून तिचा पुन्हा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रोहीत श्याम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार हे करीत आहे.




