भुसावळातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिरपुर-कन्हाळा रोडवर आपल्या मामाकडे आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बाजारपेठ पोलीस स्थानकात शिरपूर-कन्हाळा रोडवरील गोदावरी कॉलनी भागातील रहिवासी तुषार मनोहर पाल यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार, त्यांच्या खंडवा येथील निवासी असलेल्या बहिणीची 16 वर्षांची मुलगी ही सुमारे दीड महिन्यांपासून वास्तव्यास आली होती.

काल दिनांक 31 जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ती मैत्रीणीकडे जाऊन येते असे सांगून गेली. मात्र ती घरी परत आली नाही. तिचा शोध घेऊन देखील सदर मुलगी आढळून न आल्यामुळे या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 137 ( 2 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content