पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका सोबत लग्न लावून दिले. दरम्यान मुलगी ही अल्पवयीन असताना देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गरोदर राहिली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने या संदर्भात पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिब्रे हे करीत आहे.