Home Cities अमळनेर पाडळसरे धरण जनआंदोलन समितीसोबत बैठक लावण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीसोबत बैठक लावण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश


girish mahajan

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीसोबत बैठक लावण्याचे लेखी आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले आहेत. दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांनी या संदर्भात ना.महाजन यांची भेट घेत निवेदन दिले होते.

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे आंदोलन आठ दिवसांपासून सुरू आहे. धरणास अपेक्षित निधी मिळणेबाबत वेगाने कार्यवाही होत नसल्याने पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे आंदोलनास सामाजिक संघटना, राजकिय, शैक्षणिक, व्यापारी संघटनांसह सर्वच स्तरातून भरघोस पाठींबा मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जलसंपदामंत्री महाजन यांनी जनआंदोलन समितीसोबत बैठक बोलवावी, असे पत्र आ. शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री ना.महाजन यांना भेटून पत्र दिले होते. सदर पत्रावरून बैठक लावण्याचे लेखी आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले असल्याचे आ. चौधरी यांनी कळवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound