यावल प्रतिनिधी । शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृह व आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आदिवासी मंत्री ना. के.सी. पाडवी आणि आयुक्त हिरालाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, संर्पदशामुळे शासकीय आदिवासी मुलीचे कन्या आश्रमशाळा वैजापूर ता.चोपडा जि.जळगाव येथील स्व.सलोनी शिवा पावरा हिच्या परिवाराला मदत करा. शासकीय आदिवासी मुला-मुलीचे वसतिगृह नाशिक, अ.नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव सह संपूर्ण महाराष्ट्रातील वसतिगृह त्वरित चालू करण्यात यावे. खावटी अनुदान योजनेचा काही त्रुटींमुळे रिजेक्टेड झालेल्या आदिवासी बांधवांना पुन्हा सर्वे करून अनुदान देण्यात यावे.
जळगाव जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व वसतीगृहात मुला-मुलीसाठी वाढीव कोटा मंजूर करण्यात यावा. शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रलंबित त्वरित देण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल संयम योजनेची रक्कम त्वरित देण्यात यावी. शासकीय आदिवासी मुला-मुलीचे वसतिगृह प्रवेश अर्ज करण्यासाठी वेब साईट त्वरित चालू करण्यात यावी. शासकीय आदिवासी आश्रम शाळा, वसतिगृह, अनुदानित, विना अनुदानित शाळेत शासनाच्या जीआरनुसार सोय सुविधा पुरविण्यात यावे. शासकीय आदिवासी आश्रम शाळेत, वसतिगृह रोजदारी कर्मचारी यांचे बाकी असलेले मानधन देऊन त्यांना कामयस्वरूपी कायमस्वरूपी देण्यात यावे. शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह/ आश्रमशाळेत जे कर्मचारी काम करत नाही अशा कर्मचारी यांना कायदेशीर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे.
अशी विविध समस्या संदर्भात निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष दारासिंग पावरा, संभाजी राजे प्रतिष्ठान अध्यक्ष निलेश जूनरे, आदिवासी गायक संदिप गवारी आदि आदीवासी चळवळील अनेक सामाजीक कार्यकर्ते व पदाधिकारी हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.