Home Cities जळगाव भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मंत्री गिरीश महाजन

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मंत्री गिरीश महाजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत जळगाव जिल्हयातील एकमेव नाव पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा समावेश आहे.

या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, डॉ. प्रमोद सावंत, भूपेंद्रभाई पटेल, विष्णू देव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायब सिंह सैनी, हिमंता बिस्वा सरमा, शिवराज सिंह चौहान, शिवप्रकाश, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य एम. सिंधिया इत्यादी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

राज्यातील देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नारायण राणे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोंसले, विनोद तावडे, ॲड. आशिष शेलार, चंद्रकांत (दादा) पाटील, सुधीर मुनगंटीवार,राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहोळ, अशोक नेते, डॉ. संजय कुटे यांची नावे आहे. समोवश आहे. तसेच पंकजा मुंडे, स्मृती इराणी, नवनीत राणा या तीन महिला नेत्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

 


Protected Content

Play sound