मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवण्यात आले. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईत आणलं गेलं आणि मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या २४ तासापासून भुजबळ यांना ताप आहे. ताप नियंत्रित होत नसल्याने तसेच घसा दुखणे, सांधे दुखणे सारख्या आरोग्याच्या समस्या आहेत. तब्येत खूप बिघडल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.