अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, मोदी सरकारने मांडलेला हा अर्थसंकल्प अतिशय संतुलित व भारताच्या भविष्यावर मोठया मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारा तसेच खऱ्या अर्थाने समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे.
पुढे पाटील म्हणाले की, विकसित भारताच्या संकल्पपूर्ती साठी पडणारे हे पाऊल असून यात शेतकरी, महिला,युवा आणि गरीब या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय, विविध क्षेत्रांवर या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलेले दिसते.