औरंगाबाद, वृत्तसेवा | एमआयएमने सहावी यादी जाहीर केली आहे, यामध्ये सात जिल्ह्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे यादी जाहीर करण्यात आली.
या सहाव्या यादीमध्ये बीड शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही जाहीर करण्यात आलाय. बीडमध्ये एमआयएमच्या उमेदवाराचा सामना युतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर आणि आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याशी होईल. एमआयएमने परभणी, बीड, पैठण (औरंगाबाद), कामटी (नागपूर), हातकणंगले (कोल्हापूर), श्रीरामपूर (अहमदनगर) आणि धुळे या सात जागांसाठी एमआयएमने उमेदवार जाहीर केले. परभणीतून अली खान मोईन खान, बीडमधून शेख शफीक मोहम्मद, पैठण प्रल्हाद धोंडीराम राठोड, कामटी शकीबुल रहमान, श्रीरामपूर सुरेश जगधाने, हातकणंगले सागर शिंदे आणि धुळ्यातून अन्वर फारुख शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.