Home Cities रावेर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी मिलींद टोके

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी मिलींद टोके

0
49

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या ख्यातनाम संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार मिलींद टोके यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची जिल्हा बैठक आज भुसावळ येथील विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती होती. या बैठकीत चिनावल येथील मूळ रहिवाशी तथा सध्या भुसावळात स्थायीक असलेले सकाळेचे पत्रकार मिलींद टोके यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मिलींद टोके यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीतल्या उज्वल कामगिरीमुळे त्यांना जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी मिळाली असून त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound