Home Cities धुळे मिलींद नार्वेकरही शिंदे यांच्या सोबत येणार : गुलाबराव पाटील

मिलींद नार्वेकरही शिंदे यांच्या सोबत येणार : गुलाबराव पाटील

0
44

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वर्चस्वाची तुंबळ लढाई सुरू असतांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे धुळे येथील मेळाव्यातील वक्तव्य चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे.

 

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात जाणार असल्याची धक्कादायक माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एका सार्वजनिक कार्यक्रमात केली. ते म्हणाले की, आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातो. तथापि, चंपा थापा यांनी जीवनभर मातोश्रीची सेवा केल्यानंतरही ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. यानंतर उध्दव ठाकरेंचा अजून एक खास माणूस असणारे मिलींद नार्वेकर हे शिंदे गटात येणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह उध्दव ठाकरे यांना मिळाले नाही तर त्यांच्याकडे पाच आमदार देखील उरणार नाही. शिंदे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले.


Protected Content

Play sound