सावखेडा शिवारातील शेतात मायलेकीला मारहाण करून विनयभंग

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सावखेडा शिवारातील शेतात काम करत असलेल्या दोन्ही मायलेकीला काहीही कारण नसतांना गावातील आठ जणांनी शिवीगाळ करत मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारे मायलेकी याचे शेत पाचोरा तालुक्यातील सावखेडा शिवारात शेत आहे. या शेतात रविवारी ९ जून रोजी शेतात मशागत करत असतांना काहीही कारण नसतांना सावखेडा गावात राहणारे शांताबाई नथ्थू परदेशी, सुलोचनाबाई मोतीलाल परदेशी, सविता सुधाकर परदेशी, सुधाकर नथ्थू परदेशी, मोतीलाल नथ्थू परदेशी, वैभव सुधाकर परदेशी, दिनेश मोतीलाल परदेशी आणि संदीप मोतलीला परदेशी या आठ जणांनी मायलेकीला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तर यातील सुधाकर नथ्थू परदेशी आणि मोतीलाल नथ्थू परदेशी यांनी मुलीला मारहाण करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पिंपळगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे शांताबाई नथ्थू परदेशी, सुलोचनाबाई मोतीलाल परदेशी, सविता सुधाकर परदेशी, सुधाकर नथ्थू परदेशी, मोतीलाल नथ्थू परदेशी, वैभव सुधाकर परदेशी, दिनेश मोतीलाल परदेशी आणि संदीप मोतीलाल परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content