Home Cities अमळनेर किरकोळ कारणावरून मायलेकाला लाकडी काठीने बेदम मारहाण

किरकोळ कारणावरून मायलेकाला लाकडी काठीने बेदम मारहाण


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील चोपडाई गावात मोकळ्या जागेत लघवी केल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरूणासह त्यांच्या आईला चौघांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता चार जणांविरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, विशाल भागवन मोरे वय ३३ हा तरूण आल्या आई वत्सलाबाई मोरे यांच्या सोबत वास्तव्याला आहे. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता विशाल मोरे यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेत गावात राहणारा गोकूळ रामा पाटील हा लघवी करत होता. यावेळी विशाल मोरे याने जाब विचारला याचा राग आल्याने संजय रामा पाटील, वाल्मिक संजय पाटील, गोकूळ रामा पाटील आणि राकेश गोकूळ पाटील सर्व रा. चोपडाई ता. अमळनेर यांनी विशाल मोरे याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली. विशालला चौघेजण मारत असतांना त्यांची आई वत्सलाबाई ह्या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील काठी मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी विशाल तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाख्ल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.


Protected Content

Play sound