भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील मायलेकाचा मृत्यू; ममुराबाद रोडवरील घटना

जळगाव प्रतिनिधी । जळगावहून ममूराबादकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने  दुचाकीवरील मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना अरूणामाई फार्मसी कॉलेजजवळ घडली. ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी दिलीप अभिमन कोळी आणि त्यांची आई अलकाबाई अभिमन कोळी हे (एमएच १९ डीसी ६६८७) ने  १२ जून रोजी जळगावला दुचाकीने कामानिमित्त गेले. काम आटोपून सकाळी १० वाजता जळगाव ते ममूराबाद रस्त्याच्या दरम्यान असलेल्या अरूणामाई फार्मसी कॉलेज जवळून जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणारा ट्रक (एमएची १९ सीवाय ५४७३) ने जोरदार धडक दिली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले. चालकाने ट्रक सोडून फरार झाला होता. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर दोघांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईक विनोद कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Protected Content