जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सभागृहात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या उपस्थितीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस मित्रांची बैठक घेण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणि शहरातील ६० पोलीस मित्रांची बैठक घेण्यात आले. या बैठकीत पोलीस मित्र यांना त्यांचे कर्तव्य समजून सांगितले. त्यानंतर रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग दरम्यान काही माहिती मिळाल्यास, अनोळखी व संशयित व्यक्ती आढळून आल्यास तसेच संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती द्यावी जेणे करून वेळीच कारवाई करून गुन्हा होण्यास आळा बसेल व संशयिताला ताब्यात घेता येईल.
दरम्यान रात्रीचे वेळी शहरात होणाऱ्या चोऱ्या व घरफोड्या, करणारे चोर, दुचाकीवर विनाकारण फिरणारे, दुचाकीवरून महिलांची छेडखानी करणारे आणि मिरवणुकीत गोंधळ घालणारे उपद्रवी व्यक्तींची तातडीचे माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात यावी असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी केले. या बैठकीला एमआयडीसी पोलिस ठाणे अंतर्गत असलेले ६० पोलीस मित्र उपस्थित होते.