जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी सेक्टरमध्ये राहणारा वाचमनकडे भेदरलेल्या अवस्थेत दोन अल्पवयीन मुली भुकेलेल्या अवस्थेत आढळून आले. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी जावून त्यांना ताब्यात घेवून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून नातेवाईकांचा शोध घेणे सुरू आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी हद्दीत काल शनिवारी ७ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी अल्पवयीन मुली घाबरलेल्या व भुकेलेल्या अवस्थेत येथे राहत असलेला वाचमन अर्जून संतोष सोनवणे आणि त्यांची पत्नी यांच्याकडे आल्या. घाबरलेले असल्यामुळे दोघेही रडत होत्या. सोनवणे दाम्पत्याने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. एमआयडीसी पोलीसांनी तातडीने महिला पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना केले. यावेळी दोघांची चौकशी केली असता खातीजान दयमशाह मुसलमान (वय-१५) आणि मेहेक दयमशाह मुसलमान (वय-१०) रा. लालखडी नाजानगर, अमरावती अशी नावे सांगितले. या दोन्ही सख्ख्या बहिणी असल्याचे निष्पन्न झाले. दोघांना एमआयडीसी पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, पोलीस चालक सुरेश अहिरे, महिला पोलीस कर्मचारी आशा सोनवणे यांनी ताब्यात घेतले. आज रविवार ८ ऑगस्ट रोजी दोघांची वैद्यकीय तपासणी करून दोघांचे आईवडील किंवा पालक येईपर्यंत त्यांना जळगाव येथील बालसुधारगृह येथे रवाना केले आहे.