जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील एका कंपनीत कार चालवितांना नियंत्रण सुटून कार थेट तलावात गेल्याने एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारचालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाबीर खॉ आलियार खॉ पठाण रा. मास्टर कॉलनी जळगाव असे मयताचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जैन व्हॅली कंपनीत कैलास उखा जाधव रा. शिरसोली ता.जि.जळगाव हा १६ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता (एमएच १९ क्यू ८९१८) क्रमांकाची इंडीका कार घेवून गेटजवळ आला. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेला जाबीर खॉ आलियार खॉ पठाण रा. मास्टर कॉलनी जळगाव यांच्याकडे कार चालविण्यासाठी दिली. जाबीर खॉ याच्याकडे कार चालविण्याचे कोणतेही लायसन्स नव्हते. हे कार चालक कैलास जाधव याला माहित होते. जाबीर खॉ हा कार जैन व्हील कंपनीच्या ५०० एकर भागाकडे जात असताना जाबीर खॉ याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ब्रेक ऐवजी त्याने एक्सलेटर दाबले. त्यामुळे गाडी न थांबता थेट बाजूच्या तलावात गेली. यात जाबीर खॉ हा कारमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गुरूवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी जैन कंपनीचे सुरक्षा अधिकारी संजय माधवराव पाटील रा. दादावाडी, जळगाव यांच्या फिर्यादीवरून कारचालक कैलास उखा जाधव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.