जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका ट्रान्सलाईन कंपनीतून रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पाईपांसह इतर सामान चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीतील एक्स 27, 28 मधील एस.के.ट्रान्सलाईन प्रायव्हेट लिमिटेल या कंपनीत कंटेनर गाड्यांचे बॉक्स बनिवण्याचे काम होते. यात लोखंडाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. दरम्यान रविवारी रात्री 8.30 वाजता कंपनीतील कर्मचारी यांनी कंपनीला कुलूप लावले होत. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पाईप, कंटेनचे मटेरीअयल, गाड्यांचे डिस्क, लोखंडी ॲगल असा सामान अंदाजी 80 हजार रूपयांचा मुद्देमाला चोरीला गेला. आज सकाळी दररोजप्रमाणे 10.30 वाजता कंपनीचे मॅनेजर रामदास खैरनार आणि सहाय्यक व्यवस्थापक विनोद सोनवणे कंपनीत गेले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याबाबत तक्रार एमआयडीसी पोलीसांना देण्यात आले असून पंचनामा करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.