एमआयडीसी पोलिसांकडून दीड लाखांची गावठी दारु जप्त

MIDC daru news

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्फे आपल्या हद्दीत गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यात एमआयडीसी पोलीस ठाण्याने कंजरवाडा येथे केलेल्या कारवाईत दीड लाखांची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.

कारवाई करुन पोलिसांनी पोलिसांनी चेतन देविदास बाटुंगे रा. सिंगापूर, कंजरवाडा यास ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, दिपक चौधरी, अशोक सनकत, सचिन चौधरी, स्वप्निल पाटील, हर्षवर्धन सपकाळे, स्वप्निल आधारसिंग पाटील, होमगार्ड पंकज सापकर, परमेश्‍वर पाटील, संजय सोनवणे, मनोज कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत पेालिसांनी चेतन देविदास बाटुंगे यांच्याकडून 81 हजार 600 रुपये किमतची गावठी हात भट्टी दारु, कच्चे व पक्क रसायन व चमनबाई गुड्डया माचरेकर हिच्याकडून 73 हजार 200 रुपये किमतीची गावठी दारु, कच्चे व पक्क रसायन, असा एकूण 1 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Protected Content