मुंबई वृत्तसंस्था | म्हाडा परीक्षेबाबत झालेल्या बैठकीत ही परीक्षा आता टीसीएसच्या मदतीनं घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
म्हाडाच्या परीक्षेचं पेपरफुटीचं रॅकेट समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर दिलगिरी व्यक्त करत, विद्यार्थ्यांची क्षमा मागत रविवारी होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.
या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. म्हाडाची परीक्षा आता टीसीएसच्या मदतीनं लवकरात लवकर घेण्यात घेण्यात येणार असून त्यात पूर्ण पारदर्शकता राखली जाईल असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं