Home Cities अमळनेर महसूल दिनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पिंपळे खुर्द शिवारात वृक्षारोपण

महसूल दिनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पिंपळे खुर्द शिवारात वृक्षारोपण


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महसूल सप्ताहाच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द शिवारात पानंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार रुपेश कुमार खुराणा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, तहसीलदार खुराणा यांनी वृक्षारोपणासाठी चक्क बैलगाडीतून प्रवास करणे पसंत केले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला मंडळ अधिकारी वावडे, विठ्ठल पाटील, पुरुषोत्तम पाटील, पिंपळे वावडे मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, तलाठी जान्हवी जाधव, कोतवाल, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, ग्रामसेवक आणि धरती माता शेतकरी महिला गट उपस्थित होता. तसेच, बालिका स्नेही पंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्दचे सदस्य संतोष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील राजेंद्र पाटील, ग्रामसेवक के. के. लंकेश आणि परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, महसूल प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound