रावेर प्रतिनिधी । श्रीराम फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम येथील मॅक्रो व्हिजन स्कुलमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के. पाटील होते. श्रीराम फाउंडेशनतर्फे आयोजित सत्कार व सन्मान सोहळ्यात त्यांनी अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. व्यासपीठावर श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, नगराध्यक्ष दारा मोहमद, दर्जी फाउंडेशनचे गोपाळ दर्जी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राम पवार, तहसीलदार उषाराणी देवगुणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी आर पाटील, शैलेश राणे, प.स. सदस्य योगेश पाटील ,सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, व गणेश महाजन, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील ७० जणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुनीता पाटील व प्रीती कुलकर्णी यांनी केले. संपर्क अधिकारी घनश्याम पाटील यांनी आभार मानले. यावेळी तहसीलदार देवगुणे, फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, शिक्षिका कल्पना पाटील व कांचन राणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.