शेंदुर्णी येथे ‘मेंटल हेल्थ केअर’ विषयावर मार्गदर्शन शिबीर

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी । विधी सेवा प्राधिकरण मार्फत तालुका विधी सेवा समिती जामनेर व तालुका वकील संघ जामनेर यांच्या सयुक्त विद्यमानाने प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी येथे मेंटल हेल्थ केअर या विषयावर कायदेशीर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

जामनेर तालुका सेवा समिती अध्यक्ष तथा जामनेर न्यायालयाचे मुख्य न्यायधीश श्री.एम एम चितळे व सह दिवाणी न्यायधीश डी. एन . चामले साहेब यांच्या मार्गदर्शना खाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी येथे मेंटल हेल्थ केअर या विषयावर सहाय्यक आरोग्य अधिकारी गजानन माळी यांनी रुग्णालयातील लोकांना कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित वकील साहेब यांनी गरजू लोकांना मोफत कायदेशीर मदत मिळणे बाबत व सरकारी खर्चात वकील उपलब्ध करून देणे बाबत व लोक न्यायालयात केसेस आपसात तडजोड करणे बाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम साठी अँड अनिल सारस्वत सहा.सरकारी अभियोक्ता जामनेर  व सुरवाडे भाऊसाहेब यांचे सहकार्य लाभले.

यावेळी जामनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड किशोर राजपूत, ॲड दिलीप वानखेडे, ॲड धर्मराज सूर्यवंशी, ॲड प्रसन्न फासे, ॲड राहुल बावस्कर, ॲड श्रीकृष्ण देवतवाल, ॲड देवेंद्र जाधव, ॲड किशोर बारी, ॲड आशिष शुक्ला आदी उपस्थित होते. विधी सेवा प्राधिकरण यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे जनतेने कौतुक केले आहे.

 

Protected Content