श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू-काश्मीरमधील श्रीगफुरा-बिजबेहरा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इत्लिजा मुफ्ती-इक्बाल पराभव झाला आहे. त्यांचा ९७७० मतांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर अहमद यांनी पराभव केला आहे. दरम्यान, इल्तिजा यांनी निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. त्यांनी पराभव मान्य करणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.
श्रीगफुरा-बिजबेहरा हा विधानसभा मतदारसंघ आजवर पीडीपीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. १९६७ साली इल्तिजा यांचे आजोबा मुफ्ती मोहम्मद सय्यद हे काँग्रेसच्या तिकीटावर येथून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९६ साली इल्तिजा यांच्या आई मेहबुबा मुफ्ती या काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडून आल्या होत्या. १९९९ पासून २०१९ पर्यंत पीडीपीचे अब्दुल रहमान भट येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. याच मतदारसंघात इल्तिजा यांचा पराभव झाला आहे.