Home Cities जळगाव तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांची जळगावात बैठक

तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांची जळगावात बैठक

0
29

जळगाव प्रतिनिधी । प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांचा जळगाव जिल्हा दौरा सुरू आहे. जयकिसवाडीतील शासकीय पद्मालय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली.

प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे जळगाव जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जळगावात आगमन झाले. त्यावेळी तेली समाज बांधवांनी विजय चौधरी यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी ४ वाजता तेली समाज बांधवांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश तेली महासंघाच्या शासकीय सेवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बी. एम. चौधरी, प्रदेश तेली नाशिक विभागाचे कार्यध्यक्ष प्रशांत सुरळकर, प्रदेश तेली जळगाव सचिव दत्तात्राय चौधरी, प्रसिद्ध उदयोगपती रामचंद्र चौधरी, विक्की चौधरी, हर्षल चौधरी, आकाश चौधरी, तुषार चौधरी, तुषार चौधरी, भूषण आंबिकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound