धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंचांची एक बैठक आज (दि.१६) येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडली. यावेळी सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात येवून त्यांच्या सुचनाही विचारात घेण्यात आल्या.
काही सरपंचांच्या अडचणी ऐकुन त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला गेला. सरपंच व ग्रामसेवक यांची दर दोन महिन्यातून एकदा मीटिंग घेण्याचे आश्वासन बी.डी.ओ.नी यावेळी दिले.