जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबापूर परिसरात झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गेल्या महिन्यात तांबापूर परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोन गटांमध्ये हाणामारी होवून दंगल निर्माण झाली होती. यात दगडफेक करण्यात आली होती.
असे प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी मार्गदर्शन केले. जातीय सलोखा टिकविण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकजुटीने काम करा, जातीय सलोखा राखून जळगाव पॅटर्न म्हणून राज्यातील जळगावचे वर्चस्व सिध्द करण्याचे आवाहन केले. तांबापूरा भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी प्रतिष्ठीत व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपस्थितांना केले.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, नगरसेवक इब्राहिम पटेल, माणिया बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारूख शेख अब्दुल्ला, नगरसेवक गणेश सोनवणे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष रागीब अहेमद, नगरसेवक जिया बागवान, नगरसेवक मनोज अहुजा, अनीस शाह, दानिश अहमद, सलीम इनामदार, आसिफ शाह, वाहिद शेख, रियाज काकर, संजय जाधव, किरण राजपूत, रहीम तड़वी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन गोपनीय विभागाचे सहाय्य पोलीस उपनिरीक्षक विश्वास बोरसे यांनी केले.