एरंडोल,प्रतिनिधी । येथे नगरपालिका स्तरावर गुरुवार १ ऑगस्ट रोजी मुख्यधिकारी किरण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रशासन पुरस्कृत पंडित दीन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्वयं रोजगार या घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यबल समितीची बैठक नगर पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियांनातर्गत स्वयं रोजगार या घटकांतर्गत वैयक्तिक व्यवसाय,गट व्यवसाय, एस.एच.जी. बँक लिंकेज या तीन उपघटकांचे देण्यात आलेले उद्दिष्टे बँक निहाय वाटप करणे. सन २०१९ -२० वर्षातील बँक निहाय मंजुर प्रकरणे व प्रलंबित कर्ज प्रकणांबाबत आढावा घेणे. सन २०१९-२० वर्षासाठी वैयक्तिक व्यवसाय, गट व्यवसाय व एस.एच.जी.बँक लिंकेज कर्ज प्रकरणांना मान्यता देऊन बँकांकडे मंजुरीसाठी सादर करणे तसेच मुद्रा योजनांतर्गत वाटप केलेले कर्ज प्रकरणातील एस.इ.सी.सी.यादीतील लाभार्थींचे नाव नगर पालिका एरंडोल स्तरावर सादर करण्याबाबत आढावा घेण्यात आला. मुख्यधिकारी देशमुख यांनी सांगितले की, या योजनेंर्गत देण्यात आलेले भौतिक उद्दिष्टे सर्व बँकांनी आपल्या स्तरावरून तात्काळ मंजुर करण्यात यावे व योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. या बैठकीसाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर राजेश सातोपे, बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर विशाल जाधव, बुलढाणा अर्बन बँकेचे मॅनेजर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर पंकज कवले, एच.डी.एफ.सी.बँकेचे मॅनेजर चेतन पाटील, जळगाव जनता सहकारी बँकेचे मॅनेजर विलास मते व सह्ययक प्रकल्प अधिकारी महेंद्र पाटील उपस्थित होते.