रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा-मध्यप्रदेश सिमा बैठक संपन्न झाली. आगामी निवडणुका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याचे मुख्य उद्देष्ट या बैठकीच होते. पुढील महीन्यात १३ मे मतदान होणार आहे. दोन्ही सिमेवर आदर्श आचारसंहितेचे पालन करून परस्पर समन्वय निर्माण करून अवैध शस्त्रे, दारू, रोख रक्कम यासह सीमावर्ती चौक्यांवर काटेकोर देखरेख, तपास आणि कारवाई केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सीमा बैठक झाली. जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मुक्त, निष्पक्ष, अखंड आणि शांततेत पार पाडणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 13 मे 2024 रोजी मतदान होणार असल्याने जळगाव-बुऱ्हाणपूरच्या सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करून एसएसटी,एफएसटी,व्हीएसटी संघांकडून काटेकोर देखरेख ठेवून तपासणी केली जाईल आणि परस्पर समन्वयाने कारवाई केली जाईल.जिल्हा निवडणूक अधिकारी कु.भव्या मित्तल यांनी जिल्ह्यातील मागील निवडणुकीच्या काळात केलेले काम व अनुभव कथन केले.
निवडणुकीशी संबंधित विविध मुद्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.परस्पर समन्वय निर्माण करून अवैध शस्त्रे, दारू, रोख रक्कम यासह सीमावर्ती चौक्यांवर काटेकोर देखरेख, तपास आणि कारवाई केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, बुर-हानपुर जिल्हाधिकारी भव्या मित्तल, पोलीस अधीक्षक बुऱ्हाणपूर देवेंद्र पाटीदार, जिल्हा पंचायत सीईओ बुऱ्हाणपूर सृष्टी देशमुख, जिल्हा पंचायत सीईओ जळगाव अंकित, उपविभागीय अधिकारी महसूल देवयानी यादव, उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. सीमा बैठकीत उपस्थित होत्या.
दोन्ही बॉर्डरमिटींगला विशेष उपस्थिती म्हणून देश्यात सु-प्रसिद्ध असलेली आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांची होती. सृष्टी देशमुख हीला लाखो युवक व युवती फॉलो करतात. त्यांना सोशल मीडियावर दोन करोडच्यावर फॉलोवर्स आहे.नेहमी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सृष्टी मॅम सक्रीय असतात. त्यांना बघण्यासाठी व भेटण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी लांबुन-लांबुन युवक व युवती बुरहानपुर येथे येत असतात.आयएएस सृष्टी देशमुख मागील सहा महीन्यां पासुन जळगावच्या शेजारील जिल्हा बुर-हानपुर येथे झेडपीला मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.