एरंडोल, प्रतिनिधी | येथील पंचायत समिती सभागृहात एरंडोल विधानसभा निवडणुकीत आवश्यक कर्मचारी वर्गाची माहिती ऑनलाईन PPMS पद्धतीने भरण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षपदी प्रांताधिकारी विनय गोसावी हे होते.
यावेळी पंचायत समिती सभागृहात उपस्थितांना प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी मार्गदर्शन केले. सर्व कर्मचाऱ्यांची १००%माहिती भरणे, स्त्री पुरुष अपंग, दुर्धर आजार ने पीडित,निलंबित,दीर्घ रजेवर अशी डिटेल माहिती तात्काळ कशी भरावी यावर माहिती आणि वेबसाईट चे सादरीकरण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, नायब तहसीलदार अहिरे आणि जोशी, कार्यालय प्रमुख उपस्थित होते.