माजी मंत्री खडसे यांच्या वाढदिवसाच्या नियोजनार्थ मुक्ताईनगरात बैठक

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येत्या २ सप्टेंबर रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच जल्लोष बघायला मिळत असून या दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.  

वाढदिवस हा विविध लोकोपयोगी उपक्रम राबवुन साजरा करण्यासाठी मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजन बैठक पार पडली. यावेळी आठवडा भर वाढदिवसाच्या निमित्ताने विविध लोकहिताचे कार्यक्रम राबविण्याचे ठरले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी गाव तेथे शाखा आणि बुथ समित्याची  स्थापना नाथाभाऊ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्याचे ठरले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून चंद्रकांत बढे, मुक्ताईनगर तालुका ओबीसी आघाडी अध्यक्षपदी शिवा पाटील, सेवादल तालुका अध्यक्ष पदी संजय कपले, तालुका सरचिटणीस पदी सुनिल काटे, मुक्ताईनगर शहर अध्यक्षपदी राजेंद्र माळी, अल्प संख्याक शहर अध्यक्षपदी रउफ खान, मुक्ताईनगर शहर उपाध्यक्षपदी बापु ससाणे, योगेश काळे, सरचिटणीसपदी संजय कोळी यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, माजी प स सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर,माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, बोदवड नगरसेवक कैलास चौधरी, शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, रावेर बाजार समिती संचालक पंकज येवले, सय्यद अजगर, कल्पेश शर्मा, भरत अप्पा पाटील, प्रदिप साळुंखे, सुभाष खाटीक, माजी सरपंच अनिल पाटील, विनोद कोळी, कैलास कोळी, निलेश बोराखडे, विजय चौधरी, रवींद्र खेवलकर, प्रदिप पाटील, गजू लोखंडे सर,संजय कपले,विलास वानखेडे, राजेश ढोले, मुन्ना बोडे ,प्रविण दामोदरे, चेतन राजपुत पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content