फैजपूर प्रतिनिधी । रावेर, यावल, भुसावळ तालुक्यातील ईपीएस १९९५ अंतर्गत येणाऱ्या सर्व पेन्शन धारकांसाठी (दि.१८) रोजी सकाळी ९:३० वाजता फैजपूर येथील नागरिक मंडळ सभागृह बस स्टॅन्ड मागे बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, यात सर्व सहकारी संस्थांमधील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखाना, पेपरमिल, सूतगिरणी, दूध फेडरेशन, जिनिंग प्रेसिंग संस्था, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जनता बँक व इतर सहकारी बँक व कंपन्या (ज्या भारतात एकूण १८७ आहेत) सर्वांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष व सल्लागार समितीचे पी. एन. पाटील हे मान्यवर पेन्शन वाढी संदर्भात तसेच इतर सवलतीसाठी उपयुक्त माहिती देणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा व आपल्या अडचणींचे निरसन करून घ्यावे असे आवाहन मधुकर सहकारी साखर कारखाना सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश महाजन, एन. पी. चौधरी, डि. के. जावळे, कमलाकर महाजन, ए.बी. महाजन, जे.जी. महाजन, प्रकाश दोडके, धनराज खाचणे, बाळू अहिरे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.