जळगाव, प्रतिनिधी | अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ आज बुधवार १६ ऑक्टोबर रोजी विविध वक्त्यांचे जाहीर सभांचे आयोजन ग्रामीण भागात करण्यात आले आहे.
जळगाव ग्रामीण मधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ५.०० ते ६.३० वाजता किनोद येथे जाहीर सभा होणार आहे. तसेच यानंतर सायंकाळी ६.३० ते ८.०० वाजेपर्यंत कानळदा येथे तर रात्री ८ ते १० वाजेपर्यंत ममुराबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून हभप जळकेकर महाराज, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पीसी आबा पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, कृ.उ.बाजार समिती जळगाव माजी सभापती लकी अण्णा उर्फ लक्ष्मण पाटील, माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, भाजपा जळगाव तालुकाध्यक्ष संजय भोळे, धरणगाव भाजपा तालुकाध्यक्ष संजय महाजन हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या जाहीर सभांना नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रशेखर दादा मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.