नवी दिल्ली । ख्यातनाम मसाला कंपनी महाशिया दी हट्टी अर्थात एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज पहाटे निधन झाले.
मालक महाशय धर्मपाल गुलाटी (वय९८) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. ते यातून बरे झाले होते. मात्र आज पहाटे ५.३८ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
गुलाटी यांचा जन्म २७ मार्च, १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. १९४७ च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी टांगा चालवायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी पैसे जमवत दिल्लीच्या करोलबागमध्ये एक मसाल्याचे दुकान उघडले. येथूनच प्रगती करत त्यांनी एमडीएच कंपनी सुरू केली असून आज त्यांच्या एकूण १८ फॅक्टरीज आहेत. गत वर्षी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.