नवी दिल्ली प्रतिनिधी । स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या कर्जधारकांसाठी खूशखबर आहे. बँकेने सर्व कालावधीच्या कर्जावरील ‘एमसीएलआर’ अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट कमी केलेत. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होणार आहे. नवे दर १० सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहितीनुसार, एमसीएलआरमध्ये १० बेसिस पॉइंटची कपात केली असून, व्याजदर १० बीपीएसने कमी होणार आहे. दरातील कपातीमुळं वार्षिक एमसीएलआर ८.२५ टक्क्यांहून ८.१५ टक्क्यांवर आले आहे. एसबीआयने चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. ऑगस्टमध्ये आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीनंतर बँकेने दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. एसबीआयने एकीकडे एमसीएलआरमध्ये कपात केली असतानाच, मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी केले आहेत. प्रत्येक कालावधीसाठीच्या रिटेल एफडीवर २०-२५ बेसिस पॉइंट्ची कपात केल्याची घोषणा केली आहे. ठेवीदारांसाठी दरात १०-२० बीपीएसची कपात केली आहे. नवे दर १० सप्टेंबरपासून लागू होतील. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे.