लखनऊ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती हे इंडिया आघाडीसोबत येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द मायावती यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मायावती यांची पार्टी स्वबळावर लढणार आहे.
बसपा देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आपल्या स्वतःच्या जीवावरच दमदारपणे लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं आम्ही कोणाशी युती-आघाडी किंवा तिसरी आघाडी करण्याच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. ही चुकीची बातमी आहे. माध्यमांनी अशा प्रकारे खोडसाळ बातम्या देऊन आपली विश्वासार्हता गमावू नये, लोकांनी देखील सावध राहायला हवं. उत्तर प्रदेशात बसपा खूपच मजबुतीनं एकट्यानं लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं विरोधी लोक खूपच बैचेन झाले आहेत. त्यामुळं प्रत्येक दिवशी ते विविध प्रकारच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत असे मायावती म्हणाल्या. बहुजन समाजाच्या हितासाठी बसपा एकटयाने निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहे.
मायावती यांनी स्पष्ट केली भूमिका; इंडिया आघाडीसोबत जाणार नाही
10 months ago
No Comments