भुसावळ, प्रतिनिधी | भुसावळ मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांनी आज आपल्या कुटुंबियासह टिंबर मार्केट मधील बुथवर मतदान केले. त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करा असे आवाहन केले.
मतदान केल्यानंतर आ. संजय सावकारे, यांनी ‘लाईव्ह ट्रेड्रस न्यूज’ शी बोलतांना सांगितले की, लोकशाहीची परंपरेनुसार मी मतदान केले आहे. मी स्वतः उमेदवार असल्याने मला उत्साह आहे. मी सकाळी ग्रामीण आणि शहरी भागात फिरून आलो आहे. तेथे देखील मतदारांमध्ये उत्साह आहे. दोन दिवस झाले पाऊस येतो आहे. पावसाचे प्रमाण असल्याने मतदार थोडे उशिराने निघता आहेत. दुपारी १२.०० वाजेनंतर लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर निघतील. मला लोकांना पुन्हा विनंती करायची आहे की, लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर निघले पाहिजे, जो कोणी आपला पसंतीचा उमेदवार असेल त्याला मतदान करा, परंतु लोकशाही जिवंत ठेवा व मतदान करा असे आवाहन केले. यावेळी संजय सावकारे यांच्या आई सुशिलाबाई सावकारे ,बहीण लता सोनवणे, सरला सावकारे,भाचा शंभू ठोसर , चेतन सावकारे, पत्नी रजनी सावकारे यांनी देखील मतदान केले.